‘हिट अँड रन’ प्रकरणी सलमानच्या अडचणीत वाढ!

हिट अँण्ड रन प्रकरणी सलमान खान अडचणीत येण्याची शक्यता आहे. २००२ साली सलमान मद्य पिऊन गाडी चालवत होता. त्याच्या रक्तात ६२ मिली अल्कोहल आढळले होतं, अशी माहिती तत्कालीन कलीना लॅब अस्टिस्टंट डी. के. बालशंकर यांनी त्यांच्या साक्षी दरम्यान दिलीय. सलमान खान आज सत्र न्यायालयात हजर झाला होता. 

Updated: Dec 3, 2014, 02:11 PM IST
‘हिट अँड रन’ प्रकरणी सलमानच्या अडचणीत वाढ! title=

मुंबई: हिट अँण्ड रन प्रकरणी सलमान खान अडचणीत येण्याची शक्यता आहे. २००२ साली सलमान मद्य पिऊन गाडी चालवत होता. त्याच्या रक्तात ६२ मिली अल्कोहल आढळले होतं, अशी माहिती तत्कालीन कलीना लॅब अस्टिस्टंट डी. के. बालशंकर यांनी त्यांच्या साक्षी दरम्यान दिलीय. सलमान खान आज सत्र न्यायालयात हजर झाला होता. 

गेल्या सुनावणीच्या वेळी सलमान खान न्यायालयात हजर न राहिल्यानं न्यायालय सलमान खानवर नाराजी व्यक्त केली होती आणि पुढील सुनावणीच्या वेळेस सलमान खानला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार सलमान खान आज न्यायालयात हजर राहिला होता. आज न्यायालयात दोन साक्षीदांची उलट तपासणी होती. 

सलमान खान त्या रात्री मद्यधुंद अवस्थेत होता की, नाही या करता बांद्रा पोलिसांनी सलमान खानच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले होते, ते रक्त ज्या लॅब असिस्टंटनं तपासलं होतं ते बाल शंकर यांची आज न्यायालयात साक्ष झाली. सलमान खानच्या रक्तात ६२ मिली अल्कोहोल आढळलं होतं. 

गेल्या दहा वर्षांपासून हा खटला प्रलंबित आहे. नुकतंच घटनेपूर्वी सलमान खान गेलेल्या एका हॉटेलमधील काही कर्मचाऱ्यांची साक्षही कोर्टानं नोंदवून घेतलीये. मुंबईत एका फुटपाथवर झोपलेल्या बेकरीतील काही कामगारांना सलमानच्या कारनं चिरडलं होतं. सामाजिक संघटनांनीही या प्रकरणी आवाज उठवलाय.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.