याकूब ट्विट प्रकरणी बोलण्यास सलमानचा नकार

सलमान खान याने याकूबच्या फाशी संदर्भात केलेल्या ट्विटबद्दल कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. 

Updated: Aug 10, 2015, 05:44 PM IST
याकूब ट्विट प्रकरणी बोलण्यास सलमानचा नकार title=

मुंबई : सलमान खान याने याकूबच्या फाशी संदर्भात केलेल्या ट्विटबद्दल कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. 

सलमान खानच्या बजरंगी भाईजानने भारतात ३०० कोटी कमविल्याबद्दल सलमानने पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी तो बोलत होता. आता चांगल्या गोष्टीवर बोलण्याची वेळ आहे. आपण ट्विटबद्दल नंतर बोलू असे सलमानने सांगितले. 

 

पाकिस्तानातील गीताबद्दल काय बोलला सलमान

गेल्या १५ वर्षांपासून पाकिस्तानात राहणाऱ्या भारतीय मुलगी गीताला तिच्या घरी पोहचवण्यासाठी आता खुद्द बॉलिवूडचा 'बजरंगी भाईजान' सलमान खान पुढे सरसावलाय. 

सरकारने हा विषय हाती घेतला पाहिजे. त्यांनी हा विषय हाती घेतला नाही, तर आम्ही यात काही तरी करण्याचा प्रयत्न करू असे सलमानने यावेळी म्हटले आहे. 

सध्या हा विषय सरकारी अधिकारी हाताळत आहे. दोन्ही देशातील सरकार योग्य ती कारवाई करीत असल्याचेही सलमानने सांगितले. 

गीताला भारतातील तिच्या घर आणि कुटुंबीय शोधून देण्यासाठी जोरदार प्रयत्न होताना दिसतायत. गेल्या सोमवारी परदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी इस्लामाबाद स्थित भारतीय उच्चायुक्त टीसीए राघवन यांना कराचीला जाऊन मुलीची भेट घेण्याचे निर्देश दिले होते. याच प्रकरणी सलमान खाननंही गीताची मदत करायचं ठरवलं होतं. त्यासंदर्भात त्यानेही पत्रकार परिषद घेतली होती. 

पाकिस्तानचे माजी मंत्री आणि मानवाधिकार कार्यकर्ता अन्सार बर्नी यांनी गेल्या सोमवारी रात्री ट्विटरवरून ही माहिती दिलीय. गीताला आपण कोणत्या पद्धतीनं मदत करू शकतो, याबद्दल विचारपूस करण्याची जबाबदारी सलमाननं 'बजरंगी भाईजान'चा दिग्दर्शक कबीर खान यांच्याकडे सोपवलीय. 

मूळ भारतीय गीता सध्या कराचीत सामाजिक कार्यकर्ते बिलकीस ईधी य़ांच्या घरी राहतेय. सध्या गीता २२ वर्षांची आहे. ९ वर्षांची असताना ती ट्रेनमधून पाकिस्तानात पोहचली होती. गीता बोलू किंवा ऐकू शकत नाही. गीतासाठी बिलकीस यांनी आपल्या घरातच एक मंदिरही बनवलंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.