सलमानला करायचंय या 'खान'सोबत सिनेमा

सलमान खानचा लवकरच आगामी सुल्तान सिनेमा रिलीज होणार आहे. पण त्याआधी सलमान खानने आमीर खानच्या येणाऱ्या दंगल सिनेमाचं कौतूक केलं आहे. सलमानने म्हटलं की, 'माझा सिनेमा आमीरच्या सिनेमापेक्षा वेगळा आहे. दोघेही सिनेमा हे कुस्तीशी संबंधित असले तरी असं नाही की शाहरुखने लव्ह स्टोरी केली म्हणून मी ती नाही करणार. मी जंगल सिनेमाची स्टोरी ऐकली आहे आणि ती शानदार आहे.' सलमानने सुल्तानमधील कुस्तीच्या प्रशिक्षकांना दंगल सिनेमात आमीरच्या मदतीसाठी पाठवल्याचं सलमानने म्हटलं आहे.

Updated: Jun 27, 2016, 05:26 PM IST
सलमानला करायचंय या 'खान'सोबत सिनेमा title=

मुंबई : सलमान खानचा लवकरच आगामी सुल्तान सिनेमा रिलीज होणार आहे. पण त्याआधी सलमान खानने आमीर खानच्या येणाऱ्या दंगल सिनेमाचं कौतूक केलं आहे. सलमानने म्हटलं की, 'माझा सिनेमा आमीरच्या सिनेमापेक्षा वेगळा आहे. दोघेही सिनेमा हे कुस्तीशी संबंधित असले तरी असं नाही की शाहरुखने लव्ह स्टोरी केली म्हणून मी ती नाही करणार. मी जंगल सिनेमाची स्टोरी ऐकली आहे आणि ती शानदार आहे.' सलमानने सुल्तानमधील कुस्तीच्या प्रशिक्षकांना दंगल सिनेमात आमीरच्या मदतीसाठी पाठवल्याचं सलमानने म्हटलं आहे.

सलमानचा 'सुल्तान' हा पहेलवान सुल्तान अली खानची स्टोरी आहे तर आमीरचा 'दंगल' हा पहेलवान महावीर सिंह फोगट यांच्यावर बनला आहे. 'सुल्तान' पुढच्या महिन्यात ईदच्या दिवशी रिलीज होणार आहे. तर 'दंगल' डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे. आमीरसोबत काम करण्याच्या बाबतीत जेव्हा सलमानला विचारण्यात आलं तेव्हा त्याने म्हटलं की, 'मी आमीरसोबत काम करण्यासाठी खूप दिवसापासून इच्छूक आहे.'