सलमान खानच होऊ शकेल माझा पती : सानिया मिर्झा

भारताची लाडकी टेनिसस्टार सानिया मिर्झा म्हणते की सलमान खानच माझा पती होऊ शकतो. इतकं आश्चर्यचकीत होण्याची गरज नाहीये, कारण सानिया मिर्झाला सलमान खान हा तिच्या खऱ्या आयुष्यात पती म्हणून नकोय तर तिच्या आयुष्यावर साकारणाऱ्या चित्रपटात हवाय.

Updated: Nov 24, 2014, 08:07 PM IST
सलमान खानच होऊ शकेल माझा पती : सानिया मिर्झा title=

मुंबई : भारताची लाडकी टेनिसस्टार सानिया मिर्झा म्हणते की सलमान खानच माझा पती होऊ शकतो. इतकं आश्चर्यचकीत होण्याची गरज नाहीये, कारण सानिया मिर्झाला सलमान खान हा तिच्या खऱ्या आयुष्यात पती म्हणून नकोय तर तिच्या आयुष्यावर साकारणाऱ्या चित्रपटात हवाय.

काही दिवसांपूर्वी सानियाने स्वत:च्या जीवनावर कोणताच सिनेमा होऊ नये असे सांगितले होते. परंतु, जर तो होणार असेल तर माझ्या पतीची भूमिका सलमान खाननं करावी असा सानियाचा अट्टहास आहे. बॉलिवूडमध्ये सध्या खेळाडूंच्या जीवनावर सिनेमा बनवण्याचा ट्रेण्ड आला आहे. मिल्खा सिंह, मेरी कोम ही त्याचीच उदाहरणं. यानंतर महेंद्रसिंग धोनी आणि मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर चित्रपट साकारणार आहेत.

एका कार्यक्रमात सानिया मिर्झाने तिची ही इच्छा व्यक्त केली. 'जर माझ्या आयुष्यावर चित्रपट बनला तर दीपिका पादूकोणच माझ्या व्यक्तिमत्त्वाला साकारू शकेल आणि पती शोएब मलिकची भूमिका सलमान खानने साकारावी असं मला वाटते.

सलमान हा माझा फार चांगला मित्र असल्यामुळे मला त्याची आणि दीपिकाची केमिस्ट्री माझ्यारूपात पडद्यावर साकारलेली खूप आवडेल. या दोघांना एकत्र पाहणे ही सगळ्याच प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरेल. सलमान आणि दीपिका त्यांच्या लाडक्या टेनिसगर्लसाठी तरी एकत्र येतील का हा प्रश्नच आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.