लैंगिक अत्याचाराच्या आरोपात अभिनेत्री सना खानला अटक

बॉलिवूड अभिनेत्री सना खानला अटक करण्यात आलीय. सोबतच तिचा बॉयफ्रेंड इस्माइल खान यालाही मुंबई पोलिसांनी अटक केलीय. 

Updated: Oct 29, 2014, 05:12 PM IST
लैंगिक अत्याचाराच्या आरोपात अभिनेत्री सना खानला अटक title=

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री सना खानला अटक करण्यात आलीय. सोबतच तिचा बॉयफ्रेंड इस्माइल खान यालाही मुंबई पोलिसांनी अटक केलीय. 

पूनम खान नावाच्या एका महिलेनं सना आणि तिच्या बॉयफ्रेंडवर आरोप लावलाय की, या दोघांनी त्यांना मारहाण केली. महिलेनं लैगिंक अत्याचाराचाही त्यांच्यावर आरोप केलाय. 

मारहाण करतांना इस्माइल खाननं माझ्या खाजगी अंगांना खूप वाईट पद्धतीनं स्पर्श केला, असा या महिलेचा आरोप आहे. पोलिसांनी सना खान आणि इस्माइल खानला अटक केल्यानंतर अंधेरी कोर्टासमोर हजर केलंय. 

सना खान बिग बॉसची स्पर्धक होती. यापूर्वीही ती वादग्रस्त ठरलीय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.