सचिनची मुलगी 'सारा' लवकरच बॉलिवूडमध्ये?

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेट विश्वात आपलं वेगळं नाव निर्माण केलं होतं. त्यामुळे त्याची मुलं आता करियरसाठी कोणतं क्षेत्र निवडतात हा सर्वाच्यांच उत्सुकतेचा विषय आहे. सचिनचा मुलगा अर्जुन क्रिकेटर होणार हे तर निश्चीत होतं मात्र मुलगी साराचं काय? सारा लवकरचं बॉलिवूडमध्ये दिसण्याची शक्यता आहे. 

Updated: Apr 24, 2015, 11:49 AM IST
सचिनची मुलगी 'सारा' लवकरच बॉलिवूडमध्ये? title=

मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेट विश्वात आपलं वेगळं नाव निर्माण केलं होतं. त्यामुळे त्याची मुलं आता करियरसाठी कोणतं क्षेत्र निवडतात हा सर्वाच्यांच उत्सुकतेचा विषय आहे. सचिनचा मुलगा अर्जुन क्रिकेटर होणार हे तर निश्चीत होतं मात्र मुलगी साराचं काय? सारा लवकरचं बॉलिवूडमध्ये दिसण्याची शक्यता आहे. 

सचिनची मुलगी सारा बॉलिवूडमध्ये काम करतांना दिसण्याची शक्यता आहे. तिचा पहिला सिनेमा अभिनेता शाहिद कपूर याच्यासोबत असण्याची शक्यता आहे, अशी माहिती मनोरमा ऑनलाईनने दिली आहे. 

सचिन तेंडुलकरने जेव्हा क्रिकेटमधून संन्यास घेतला, तेव्हा पत्रकारांनी सचिनला साराच्या बॉलिवूड एंट्रीबाबत प्रश्न विचारला गेला होता. मात्र सचिनने त्यावेळी स्पष्ट बोलण्यास नकार दिला होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.