saturday sunday एक अॅक्शन थ्रिलर सिनेमा

saturday sunday हा एक रोमांचक अॅक्शन थ्रिलर पार्श्वभुमिवरचा सिनेमा आहे.. एक वेगळीच कथा मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक मकरंद देशपांडे यांनी या सिनेमाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलाय. एका शासकीय अधिकारीनं रचलेला हा एक जिवघेणा खेळ आहे.

Updated: Aug 9, 2014, 12:01 AM IST
saturday sunday एक अॅक्शन थ्रिलर सिनेमा title=

मुंबई : saturday sunday हा एक रोमांचक अॅक्शन थ्रिलर पार्श्वभुमिवरचा सिनेमा आहे.. एक वेगळीच कथा मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक मकरंद देशपांडे यांनी या सिनेमाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलाय. एका शासकीय अधिकारीनं रचलेला हा एक जिवघेणा खेळ आहे.

कथा

हा अधिकारी म्हणजे अभिनेता मकरंद देशपांडे.. 8 गॅंगस्टर कशाप्रकारे एका शुटींगच्या बंगल्यावर येऊन पोहोचतात, प्रत्येकाचं एक वेगळं बॅगराऊंड, एक वेगळी विचारसरणी.

या आठही जणांना एका ठरविक लोकेशनवर आणलं जातं, एवढंच नाही तर यात एक एन्काऊंटर स्पेशलिस्ट , एक क्राईम रिपोर्टर, एकस्ट्रगलिंग हीरोइन अशा अनेकांचा समावेष असतो.. या सगळ्यांना इथे बोलवण्यामागचा उद्देश काय? य़ा शासकीय अधिकारीच्या मनात असतंतरी काय? हे सगळे प्रश्न सिनेमा पाहताना आपल्या मनात घर करतात.. 

दिग्दर्शन
एक रोमांचक थारारपट मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक मकरंद देशपांडेयांनी saturday sunday या सिनेमाच्या माध्यमातून केलाय.. डिश्काँउ ढिश्काँउचा थरार आणि त्याच बरोबर चांगली हुशारी रुपेरी पडद्यावर आणण्याचा मकरंद देशपांडेचा हा प्रयत्न ब-यापैकी काम होताना दिसते. 

अभिनय
मकरंद देशपांडे यांनी साकारलेला देशमुखसाहेब खूपच भावते. एक अत्यंत वेगळं व्यक्तीरेखा त्यांनी यात चित्रित करण्याचं धाडस केलंय.. आणि त्यांना ते साकारण्यात ब-यापैकी यशही मिळालंय.
अनेकदा रुपेरी पडद्यावर पोलिसाच्या भुमिकेत दिसणारा अभिनेता मुर्ली शर्मानं साकारलेला  एनकाउंटर स्पेशलिस्ट बी वाय वर्मानं वास्तवाशी संलग्न वाटतो.
पोश्टर बॉईज असो किव्हा saturday sunday नेहा जोशी ही अभिनेत्री आपल्या प्रत्येक सिनेमात काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करतेय.. या सिनेमातही तिचा अभिनय, तिचा एकुण अभिनय नोट केल्याशिवाय राहत नाही. 
अमृता सुभाष, अमृता संत या दोघींनीही आपआपल्या व्यक्तिरेखा उत्तम पार पाडल्या आहे

निष्कर्ष
या सिनेमातले कलाकार आणि त्यांचे अभिनय लाजवाब आहेत.. या सिनेमात जे खडकतं ते म्हणजे सिनेमाची पटकथा.. सिनेमाच्या पटकथेवर आणखी काम करायला हवं होतं त्याच बरोबर काही ठिकाणी काही दृश्यांमध्ये लिंक लागत नाही, ज्यामूळे सिनेमा थोडा भरकटला जातो.

रेटींग
मकरंद देशपांडे यांच्या या अभिनय अधिक चांगला थरारपट saturday sundayअसून त्याला 3 स्टार्स.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.