शाहरुख खानच्या ड्रायव्हरला बलात्कार प्रकरणी अटक

अभिनेता शाहरुख खानच्या ड्रायव्हरला एका मोलकरणीवर बलात्कार केल्याच्या आरोपात अटक करण्यात आलीय. अभिनेत्री संगीता बिजलानी हिच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीवर ड्रायव्हरनं बलात्कार केल्याचा आरोप आहे. 

Updated: Jun 26, 2014, 10:50 AM IST
शाहरुख खानच्या ड्रायव्हरला बलात्कार प्रकरणी अटक title=

मुंबई: अभिनेता शाहरुख खानच्या ड्रायव्हरला एका मोलकरणीवर बलात्कार केल्याच्या आरोपात अटक करण्यात आलीय. अभिनेत्री संगीता बिजलानी हिच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीवर ड्रायव्हरनं बलात्कार केल्याचा आरोप आहे. 

शाहरूखच्या घरी नोकरी लावून देण्याचं आमिष देत त्यानं 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.आरोपी चालक 35 वर्षीय राजू उर्फ पिंटू मिश्रा यानं या तरुणीशी जवळीक साधली होती. 

20 जूनला ही घटना घडलीय. आरोपी पिंटू मिश्रानं नालासोपारा रेल्वेस्टेशन जवळील गेस्ट हऊसला नेऊन पीडित तरुणीवर बलात्कार केला. वांद्रे पोलिसांनी चालकाला अटक केली असून त्याला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.