शाहरुख खान... सर्वात श्रीमंत अभिनेता!

शाहरुख खान आता बॉलिवूडमध्ये सगळ्यात श्रीमंत अभिनेता म्हणून ओळखला जाणार आहे.  वेल्थ रिसर्च फर्म ‘वेल्थ एक्स’च्या म्हणण्यानुसार भारतीय श्रीमंतांच्या यादीत जागा मिळवणारा शाहरुख हा पहिला अभिनेता ठरलाय. 

Updated: Sep 4, 2014, 05:47 PM IST
शाहरुख खान... सर्वात श्रीमंत अभिनेता! title=

मुंबई : शाहरुख खान आता बॉलिवूडमध्ये सगळ्यात श्रीमंत अभिनेता म्हणून ओळखला जाणार आहे.  वेल्थ रिसर्च फर्म ‘वेल्थ एक्स’च्या म्हणण्यानुसार भारतीय श्रीमंतांच्या यादीत जागा मिळवणारा शाहरुख हा पहिला अभिनेता ठरलाय. 
‘वेल्थ एक्स’नुसार, शाहरुखची एकूण संपत्ती 3,660 करोड रुपये इतकी आहे. तसंच, जगभरातील सगळ्यात श्रीमंत अभिनेता म्हणून शाहरुखचा दुसऱ्या क्रमांक लागलाय. याआधी, कोणत्याही भारतीय अभिनेत्याला जगातील श्रीमंतांच्या या यादीत स्थान मिळालेलं नाही.
‘वेल्थ एक्स’च्या भारतीय श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानावर रिलायन्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा क्रमांक लागलाय. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 5,21,550 करोड रुपये इतकी मोजली गेलीय. तर दुसऱ्या स्थानावर स्टील किंग म्हणून ओळखले जाणारे लक्ष्मी मितल आहेत. त्यांची संपत्ती 1,04,920 करोड रुपये आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.