शाहिदनं सावत्र वडिलांना दिलं फोनवरून लग्नाचं आमंत्रण

अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या लग्नासाठी येणाऱ्या पाहुण्यांची यादी जवळपास तयार झालीय. या यादीत शाहिदचे सावत्र वडील राजेश खत्तर यांच्या नावाचाही समावेश आहे. सोबतच राजेश यांची पत्नी सज्जानी यांनाही या लग्नाचं आमंत्रण दिलं जाणार आहे. 

Updated: Jun 19, 2015, 08:02 PM IST
शाहिदनं सावत्र वडिलांना दिलं फोनवरून लग्नाचं आमंत्रण title=

मुंबई : अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या लग्नासाठी येणाऱ्या पाहुण्यांची यादी जवळपास तयार झालीय. या यादीत शाहिदचे सावत्र वडील राजेश खत्तर यांच्या नावाचाही समावेश आहे. सोबतच राजेश यांची पत्नी सज्जानी यांनाही या लग्नाचं आमंत्रण दिलं जाणार आहे. 

शाहिदची आई निलिमा अजीम यांचं पहिलं लग्न पंकज कपूर यांच्यासोबत झालं होतं. 1984 मध्ये निलिमा - पंकज यांचा घटस्फोट झाला. 

त्यानंतर निलिमा यांनी 1990 मध्ये राजेश यांच्याशी दुसरा विवाह केला. निलिमा-राजेश या दाम्पत्याला ईशान हा मुलगा झाला. पण, हादेखील विवाह फार काळ टिकू शकला नाही... आणि 2001 साली दोघांचे मार्ग वेगळे झाले. 

त्यानंतर, 2004 साली निलिमा यांनी रजा अली यांच्याशी तिसरा विवाह केला. परंतु, हे नातंदेखील फार तग धरू शकलं नाही. 2009 साली निलिमा यांनी रजा यांच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

सध्या, संपूर्ण कुटुंब शाहिदच्या लग्नाच्या तयारीत लागलंय. राजेश आणि त्यांची पत्नी सज्जानी हे दोघेही शाहिदच्या लग्नाच्या बातमीनं खूश आहेत. 

महत्त्वाचं म्हणजे, शाहिदनं आपल्या लग्नासाठी बोलावण्यात येणाऱ्या पाहुण्यांची यादी आणि मेन्यू स्वत: तयार केलेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.