फ्रान्स राष्ट्रपतींसोबत शाहरूख-ऐश्वर्या करणार भोजन

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी असलेले फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलाँद यांच्यासोबत दुपारी भोजनासाठी खास अभिनेता शाहरूख खान, अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन, कल्की कोचलिन आणि आदित्य चोप्रा उपस्थित राहणार आहेत. 

Updated: Jan 26, 2016, 02:05 PM IST
फ्रान्स राष्ट्रपतींसोबत शाहरूख-ऐश्वर्या करणार भोजन title=

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी असलेले फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलाँद यांच्यासोबत दुपारी भोजनासाठी खास अभिनेता शाहरूख खान, अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन, कल्की कोचलिन आणि आदित्य चोप्रा उपस्थित राहणार आहेत. 

फ्रान्सचे भारतातील राजदूत रिचीएर यांच्यातर्फे या समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या भोजनादरम्यान ओलाँद उपस्थित शाहरूख खान, अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन, कल्की कोचलिन आणि आदित्य चोप्रा यांच्याशी सिनेमाबाबत चर्चा करणार आहेत.

शाहरूख खानला २०१२ साली फ्रान्सचा 'नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अॅण्ड लेटर्स' हा पुरस्कार तेथील सरकारने दिला होता. त्यानंतर २०१४ साली 'लिजन ऑफ ऑनर' हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कारही त्याला देण्यात आला होता. 

ऐश्वर्या राय गेली दहा वर्षे फ्रान्सच्या कान्स फिल्म फेस्टीव्हलचे आकर्षण राहिली आहे. तर कल्की कोचलिन मूळची फ्रेंच नागरिक आहे. आदित्य चोप्राही अनेक सिनेमांचे शूटिंग करताना फ्रान्सला पसंती दिलेय. त्यामुळेही त्यालाही भोजनाचे निमंत्रण देण्यात आले आहे.