'षमिताभ' (रिव्ह्यू ) : अमिताभ आणि धनुषनं जिंकलं!

'चीनी कम' आणि 'पा' सारखे जबरदस्त चित्रपट देणारे दिग्दर्शक आर. बाल्की यांनी बॉलिवूडला पुन्हा एक दमदार चित्रपट दिलाय. 'षमिताभ'च्या रुपात बाल्कीनं एक उत्तम चित्रपट प्रेक्षकांसमोर आणलाय. जर चांगली भूमिका असेल तर आपण त्याला चार चाँद लावू शकतो, हे महानायक अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय. तर दुसरीकडे अक्षरा आणि धनुषही आपल्या अभिनयाद्वारे सर्वांचं कौतुक मिळवलं.

Updated: Feb 8, 2015, 04:36 PM IST
'षमिताभ' (रिव्ह्यू ) :  अमिताभ आणि धनुषनं जिंकलं!   title=

मुंबई: 'चीनी कम' आणि 'पा' सारखे जबरदस्त चित्रपट देणारे दिग्दर्शक आर. बाल्की यांनी बॉलिवूडला पुन्हा एक दमदार चित्रपट दिलाय. 'षमिताभ'च्या रुपात बाल्कीनं एक उत्तम चित्रपट प्रेक्षकांसमोर आणलाय. जर चांगली भूमिका असेल तर आपण त्याला चार चाँद लावू शकतो, हे महानायक अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय. तर दुसरीकडे अक्षरा आणि धनुषही आपल्या अभिनयाद्वारे सर्वांचं कौतुक मिळवलं.

फिल्मचं वैशिष्ट्य म्हणजे ही एक कादंबरी सारखी फिल्म आहे, इतर मसाला फिल्म्स सारखी नाही.

पटकथा -

महाराष्ट्राच्या एका गावात राहणारा एक मुका मुलगा दानिश, त्याला चित्रपटांमध्ये हिरो व्हायचंय. दानिशला चित्रपट बघणं आणि त्यातील हिरोंसारखा अभिनय करणं खूप आवडतं. व्हिडिओ कॅसेट घेऊन-घेऊन तो चित्रपट बघतो. अशीच त्याची एंट्री मुंबईत या महानगरीत होते. चित्रपटांच्या सेट्सवर फिरता-फिरता तो असिस्टंट डायरेक्टर अक्षराला धडकतो. अक्षराची भोळी वृत्ती दानिशचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करते. आता चित्रपटांमध्ये मुक्या व्यक्तीला आवाज देण्यासाठी नवीन प्रयत्न केला जातो.

दिग्दर्शन -
बाल्कीनं खूप सुंदर पद्धतीनं एक व्यक्ती आणि आवाज यादरम्यान सुरू असलेलं अंतरद्वंद्व बारिकीनं चित्रित केलंय. दानिश (धनुष)चा आवाज बनलेय अमिताभ सिन्हा (अमिताभ बच्चन) . यांच्यादरम्यानची ही लढाई अमिताभ बच्चन आणि धनुषने आपल्या अभिनयानं चांगलीच रंगवलीय.

अभिनय - 
अमिताभ सिन्हा (अमिताभ बच्चन) चित्रपटात एका स्ट्रगलिंग अॅक्टरची भूमिका साकारलीय. मात्र संघर्ष करतांना अमिताभ दारूडा होतो. कब्रिस्तानमध्ये त्यांचं वास्तव्य. चित्रपटात अमिताभ यांच्या चेहऱ्यावरील हाव-भाव शानदार पद्धतीनं साकारले आहेत. चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा अभियन कॉमेडी आणि ड्रामामध्ये त्यांच्या मुकाबला कोणी करू शकत नाही, हे सिद्ध करतं. त्यांची डायलॉग डिलिव्हरही दमदार आहे.

अमिताभ आणि धनुष यांच्या अभिनयाच्या तुलनेत अक्षरा हसन थोडी निराश करते. मात्र ही तिची पहिली फिल्म आहे हे आपण विसरता कामा नये. आपल्या पहिल्या चित्रपटात अक्षरानं संतोषजनक प्रदर्शन केलंय. धनुष आणि अमिताभ यांच्या अभिनयापुढे अक्षराचा रोल समोर येऊ शकला नाहीय. तर चित्रपटातील इतर कलाकारांनीही आपल्या भूमिकेशी न्याय केलाय.

चित्रपटाची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे त्याचं ढिलेपण. चित्रपट थोडा लांबलचक असल्यामुळे काही ठिकाणी तो थांबल्या सारखा वाटतो. एकूणच चित्रपट धनुष आणि अमिताभ यांच्या अभिनयासाठी नक्की पाहावा. चित्रपटाची कथाही जरा हटके आहे. जर चित्रपटाचं संपादन थोडं आणि चांगलं झालं असतं तर फिल्म आणखीच चांगली झाली असती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.