व्हिडीओ | शांताबाईच्या ऑडीओ साँगने जिंकलं, पण व्हिडीओने भ्रमनिरास

सुमित म्युझिक कंपनीने शांताबाई गाण्याचं ऑफिशियल म्युझिक साँग आणलं आहे, पण गाण्यापेक्षा चित्रिकरणाचा दर्जा खूपच घसरला आहे, यापूर्वी ज्यांना शांताबाई गाणं आवडलं, त्यांचा भ्रमनिरास करणारं हे चित्रिकरण आहे.

Updated: Oct 21, 2015, 05:39 PM IST
व्हिडीओ | शांताबाईच्या ऑडीओ साँगने जिंकलं, पण व्हिडीओने भ्रमनिरास title=

मुंबई : सुमित म्युझिक कंपनीने शांताबाई गाण्याचं ऑफिशियल म्युझिक साँग आणलं आहे, पण गाण्यापेक्षा चित्रिकरणाचा दर्जा खूपच घसरला आहे, यापूर्वी ज्यांना शांताबाई गाणं आवडलं, त्यांचा भ्रमनिरास करणारं हे चित्रिकरण आहे.

शांताबाईचा ऑफिशीयल व्हिडीओ बातमीच्या सर्वात खाली पाहा

विशेष म्हणजे या गाण्यात लोकप्रिय झालेले संजय लोंढे यांना एकही फ्रेममध्ये दाखवण्यात आलेलं नाही.

मराठीतील एकही ओळखीचा चेहरा यात नाही, वास्तविक पाहता गाण्याची लोकप्रियता पाहून, जनतेला ओळखीच्या असलेल्या चेहऱ्यांनीही उत्सुकता दाखवली असती, शांताबाई या गाण्याचा दर्जा, सध्या केलेल्या चित्रिकरणामुळे ढासळणार आहे.

एकंदरीत सुमित म्युझिकने शांताबाई गाण्याचं ऑफिशियल साँग आणलं असलं, तरी चित्रिकरणातून गाण्याचा दर्जा गाठता आलेला नाही.

पाहा शांताबाई गाण्याचं ऑफिशियल साँग

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.