शशांकसोबतच्या फोटोतील 'ती' कोण?

झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका होणार सून मी या घरचीमधील श्री अर्थात शशांक केतकर सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आलाय. या चर्चेचे कारणही तसेच काहीसे आहे. 

Updated: Feb 17, 2017, 09:29 AM IST
शशांकसोबतच्या फोटोतील 'ती' कोण?
सौजन्य - फेसबुक

मुंबई : झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका होणार सून मी या घरचीमधील श्री अर्थात शशांक केतकर सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आलाय. या चर्चेचे कारणही तसेच काहीसे आहे. 

शशांकने नुकताच फेसबुकवर एका तरुणीसह फोटो अपलोड केलाय. त्यामुळे शशांकसोबतची ती कोण असाच प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडलाय. शशांकसोबत असलेल्या तरुणीचे नाव प्रियंका ढवळे असल्याचे समजतेय.

शशांकसह तिच्याही फेसबुवकर या दोघांचा प्रोफाईल फोटो आहे. त्यामुळे या चर्चेला अधिकच उधाण आलेय. होणार सून मी नंतर शशांक सध्या झी युवा वाहिनीवरील इथेच टाका तंबू या मालिकेत दिसतोय.