सनीच्या कंडोमच्या जाहिरातीवर शिल्पा शेट्टी म्हणते...

पॉर्नस्टार आणि अभिनेत्री सनी लिओन हिची पाठराखण करण्याकरता आता अभिनेत्री शिल्पा शेट्टी धावलीय. जाहीरपणे शिल्पानं आपली बाजू मांडलीय.

Updated: Sep 4, 2015, 02:21 PM IST
सनीच्या कंडोमच्या जाहिरातीवर शिल्पा शेट्टी म्हणते... title=

मुंबई : पॉर्नस्टार आणि अभिनेत्री सनी लिओन हिची पाठराखण करण्याकरता आता अभिनेत्री शिल्पा शेट्टी धावलीय. जाहीरपणे शिल्पानं आपली बाजू मांडलीय.

सनी लिओनच्या कंडोमच्या जाहिरातीवर राजकीय वर्तुळातून होणारी टीका म्हणजे 'मूर्खपणा' असल्याचं शिल्पानं म्हटलंय. 

'हे असं विचार करणारे काही नमुने असतील... मला नाही वाटत की सगळेच या पद्धतीनं विचार करतात. या अशा गोष्टी तर सगळीकडेच सुरू आहेत. अनेक वाद-विवाद सगळीकडेच सुरू आहेत... आणि त्या सगळ्यांनाच महत्त्व देणंही मूर्खपणाच आहे' असं शिल्पानं म्हटलंय. 

'मला एव्हढंच म्हणायचंय की हातांची पाचही बोटं सारखी नसतात. जगात सगळ्याच पद्धतीची लोक असतात. तेव्हा फक्त सकारात्मक गोष्टींकडे लक्ष द्या. मला भारत हा खूप महान देश वाटतो... माझं खरोखरच देशावर प्रेम आहे... आणि मला भारतीय असल्याचा, भारताचं प्रतिनिधित्व करण्याचा अभिमानही आहे' असंही यावेळी शिल्पानं म्हटलंय. 

VIDEO पाहा - सनी लिऑनची उत्तेजक कंडोम जाहिरात (अनसेन्सर्ड) : या व्हिडिओने निर्माण झाला वाद?

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (सीपीआय) चे वरिष्ठ नेता अतुल अंजान यांनी देशात बलात्कारासारख्या घटना बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओन हिच्या कंडोमच्या जाहिरातींमुळे होत असल्याचा आरोप केला होता.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.