नव्या 'अंगुरी भाभी'बद्दल पाहा, काय म्हणतेय शिल्पा शिंदे...

काही अगोदर 'भाभीजी घर पर हैं' या कार्यक्रमातून अंगुरी भाभीच्या भूमिकेत दिसलेल्या शिल्पा शिंदे आणि प्रोड्युसरमधला वाद काही संपतानाची चिन्हं दिसत नाहीत... त्यातच शिल्पानं आता सध्या 'अंगुरी भाभी'ची भूमिका निभावणाऱ्या अभिनेत्री शुभांगी अत्रेवरही तोंडसुख घेतलंय. 

Updated: May 1, 2016, 12:30 PM IST
नव्या 'अंगुरी भाभी'बद्दल पाहा, काय म्हणतेय शिल्पा शिंदे... title=

मुंबई : काही अगोदर 'भाभीजी घर पर हैं' या कार्यक्रमातून अंगुरी भाभीच्या भूमिकेत दिसलेल्या शिल्पा शिंदे आणि प्रोड्युसरमधला वाद काही संपतानाची चिन्हं दिसत नाहीत... त्यातच शिल्पानं आता सध्या 'अंगुरी भाभी'ची भूमिका निभावणाऱ्या अभिनेत्री शुभांगी अत्रेवरही तोंडसुख घेतलंय. 

शिल्पा आपल्या भूमिकेच्या रिप्लेसमेंटवर काही फारसी खुश दिसत नाहीय. 'शुभांगी ही खूप चांगली कॉपी कॅट आहे... 'अंगुरी'सारखं दिसणं आणि कपडे परिधान करणं खूप सोप्पं आहे... पण तिच्यासारखा अभिनय करणं तितकं सोप्पं नाही', असं शिल्पानं म्हटलंय. 

'शुभांगी ही खूप चांगली अभिनेत्री आहे पण तिनं स्वत:ला बंधनात अडकवून घेऊ नये, आणि नवं काहीतरी करून स्वत:ची ओळख बनवावी' असा अनाहूत सल्लाही शिल्पानं शुभांगीला देऊन टाकलाय.   

आता, प्रेक्षकांच्या मनात अंगुरी भाभी म्हणून शुभांगी यशस्वी होणार किंवा नाही हे येणारा काळच सांगेल.