रिअल लाईफमध्येही श्रद्धा होती 'हाफ गर्लफ्रेंड'

सध्या बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या आगामी 'हाफ गर्लफ्रेंड' या सिनेमामुळे चांगलीच चर्चेत आहे. या सिनेमाची दोन गाणी नुकतीच रिलीज झाली. या गाण्यांना प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळतोय.

Updated: Apr 22, 2017, 06:09 PM IST
रिअल लाईफमध्येही श्रद्धा होती 'हाफ गर्लफ्रेंड' title=

मुंबई : सध्या बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या आगामी 'हाफ गर्लफ्रेंड' या सिनेमामुळे चांगलीच चर्चेत आहे. या सिनेमाची दोन गाणी नुकतीच रिलीज झाली. या गाण्यांना प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळतोय.

यादरम्यानच श्रद्धाने एक मोठा खुलासा केलाय. रील लाईफमध्ये हाफ गर्लफ्रेंड साकारणारी श्रद्धा रिअल लाईफमध्येही हाफ गर्लफ्रेंड होती.

श्रद्धा म्हणाली, कॉलेजच्या दिवसांत मला एक मुलगा फार आवडायचा. कॉलेजमध्ये असताना मी हाफ गर्लफ्रेंड बनून राहिले होते. त्या मुलाशी मला पूर्णपणे कमिटेड व्हायचे नव्हते.