सोनाक्षी सिन्हा लवकरच विवाहबंधनात?

बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सध्या बीटाऊनमध्ये सुरु आहेत. सोनाक्षी तिचा बॉयफ्रेंड बंटीसोबत विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोलले जातेय. 

Updated: Aug 11, 2016, 10:44 AM IST
सोनाक्षी सिन्हा लवकरच विवाहबंधनात? title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सध्या बीटाऊनमध्ये सुरु आहेत. सोनाक्षी तिचा बॉयफ्रेंड बंटीसोबत विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोलले जातेय. 

बंटीने सोनाक्षीला लग्नासाठी प्रपोज केले होते. सोनाक्षीनेही लग्नासाठी होकार दिलाय. त्यामुळे आपल्या चित्रपटांचे शूटिंग आटोपण्यात ती व्यस्त झालीये. 

सूत्रांच्या माहितीनुसार, ते दोघं लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. वेब पोर्टल बॉलीवुडलाइफ.कॉम च्या माहितीनुसार, सोनाक्षी आपल्या चित्रपटांचे शूटिंग लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. जेणेकरुन तिला स्वत:च्या पर्सनल लाईफकडे वेळ देता येईल. 

दरम्यान, सोनाक्षीकडे सध्या अनेक चित्रपट आहेत त्यामुळे याचे शूटिंग कधी पूर्ण होईल हे सांगता येत नाही.