ऑन स्क्रिन टक्कल करायला आवडेल : सोनम

सोनम कपूरच्या करिअरला यू-टर्न देणारा चित्रपट म्हणजे नीरजा. मात्र बॉलिवूडच्या या खुबसुरत हिरॉईनला हवाय एक वेगळाच लूक. 

Updated: Jun 18, 2016, 05:11 PM IST
ऑन स्क्रिन टक्कल करायला आवडेल : सोनम title=

मुंबई : सोनम कपूरच्या करिअरला यू-टर्न देणारा चित्रपट म्हणजे नीरजा. मात्र बॉलिवूडच्या या खुबसुरत हिरॉईनला हवाय एक वेगळाच लूक. 

कसा हवाय सोनमला नवा लूक

नुकत्याच एका मुलाखतीत सोनमने सांगितले की, ऑन स्क्रिन टक्कल करायला आवडेल. 

माझ्या डोक्याचा आकार एकदम परफेक्ट आहे. मी जर ऑनस्क्रिन टक्कल गेले तर तो लूक खूप भारी दिसेल. 
 
ओम प्रकाश यांच्या 'मिरझिया' या चित्रपटात तिचा असाच लूक असणार होता. त्यानंतर 'सरस्वती चंद्र' या चित्रपटासाठी देखील मला टक्कल करायला सांगितलेले आणि मी तयारही होते मात्र हे दोन्ही चित्रपट रखडले. त्यामुळे माझी टक्क्ल करायची ईच्छा अपूरी राहिली.