सोनमच्या 'नीरजा'ची कोटीच्या कोटी उड्डाणे

मुंबई : सोनम कपूरची प्रमुख भूमिका असलेला 'नीरजा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे घेतोच आहे. 

Updated: Mar 1, 2016, 05:08 PM IST
सोनमच्या 'नीरजा'ची कोटीच्या कोटी उड्डाणे  title=

मुंबई : सोनम कपूरची प्रमुख भूमिका असलेला 'नीरजा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे घेतोच आहे. राम माधवानी यांचे दिग्दर्शन असलेला 'नीरजा' याने आत्तापर्यंत ५०.१२ कोटींचा गल्ला जमवला आहे. बॉलिवूडमधील चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी यासंबंधी ट्वीट करुन यासंबंधीची माहिती दिली आहे. 

१९८६ साली पॅन अमान एअरलाईन्सच्या विमानाचं दहशतवाद्यांनी अपहरण केलं होतं. त्या विमानातील प्रवाशांचे प्राण वाचवताना नीरजा भानोत यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली होती. तिच्याच या शौऱ्याच्या कहाणीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. 

७०० स्क्रीन्सवर रिलीज झालेल्या 'नीरजा'ने पहिल्या दिवशी फारच कमी कमाई केली होती. पण, नंतर माऊथ पब्लिसिटीच्या माध्यमातून मात्र या चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली.