किंग खानने त्याच्या 'जबरा फॅन'ला दिली नोकरीची ऑफर

मुंबई : किंग खान शाहरुखचे फॅन्स त्याच्यासाठी वेडे आहेत. आपल्या हिरोसाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते.

Updated: Mar 8, 2016, 12:34 PM IST
किंग खानने त्याच्या 'जबरा फॅन'ला दिली नोकरीची ऑफर title=

मुंबई : किंग खान शाहरुखचे फॅन्स त्याच्यासाठी वेडे आहेत. आपल्या हिरोसाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते. शिवम नावाच्या त्याच्या एका फॅनने शाहरुखच्या आगामी 'फॅन' चित्रपटाचा ट्रेलर स्वतःच्या पद्धतीने तयार केला. त्याने हा व्हिडिओ शाहरुख खानला ट्वीट केला. 

शाहरुख त्याचा हा ट्रेलर पाहून इतका प्रभावित झाला आणि त्याने या 'जबरा फॅन'ला चक्क स्वतःच्या कंपनीत काम करण्याची ऑफर दिलीये. 'तू येऊन आमच्या व्हीएफएक्स स्टूडिओत काम का नाही करत?' असा प्रश्न विचारत त्याने ही ऑफर दिलीये. या ऑफरमुळे शिवमसाठी आता आकाश ठेंगणं झालं असणार हे नक्की.