गुत्थीची पुन्हा एंट्री, स्वत:च्याच कार्यक्रमाची थट्टा!

कॉमेडी नाइट्स विथ कपिलच्या शोमध्ये सुनील ग्रोव्हरची पुन्हा गुत्थीच्या रुपात एंट्री झालीय. यापूर्वी सुनील बिट्टू शर्माच्या सासऱ्याच्या रुपात शोमध्ये परतला होता. 

Updated: Aug 11, 2014, 08:21 PM IST
गुत्थीची पुन्हा एंट्री, स्वत:च्याच कार्यक्रमाची थट्टा! title=
सौजन्य: कलर्स

मुंबई: कॉमेडी नाइट्स विथ कपिलच्या शोमध्ये सुनील ग्रोव्हरची पुन्हा गुत्थीच्या रुपात एंट्री झालीय. यापूर्वी सुनील बिट्टू शर्माच्या सासऱ्याच्या रुपात शोमध्ये परतला होता. 

येत्या एपिसोडमध्ये सुनीलनं पुन्हा गुत्थी अवतार धारण केलाय आणि पलकसोबत गुत्थीही दिसणार आहे. पण या एपिसोडचं वैशिष्ट्य म्हणजे यात गुत्थी स्वत: आपल्या ‘मॅड इन इंडिया’ या शोची खिल्ली उडवतांना दिसेल. 

शोच्या ट्रेलरमध्ये कपिल गुत्थीला विचारतो की काही महिन्यांपासून तू कुठे गायब झाली होती. तेव्हा आपल्या स्टाइलनं गुत्थीनं उत्तर दिलंय आणि तिच्याच शोची खिल्ली उडवलीय. या एपिसोडमध्ये अक्षय कुमार आणि तमन्ना भाटिया उपस्थित असेल.  
पाहा ट्रेलर:  

 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.