सनी लिऑन सुरू करतेय नवा बिझनेस

हिंदी सिनेमामध्ये झळकणारी सनी लिऑन आता व्यावसायिक होणार.

Updated: Feb 20, 2016, 05:23 PM IST
सनी लिऑन सुरू करतेय नवा बिझनेस  title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये आल्यानंतर सनी लिऑन हिने ४ वर्षात चांगलंच नाव कमावलं आहे. हिंदी सिनेमामध्ये झळकणारी सनी लिऑन आता व्यावसायिक होणार आहे.

सनी लिऑन आता बिजनेस सुरू करते आहे. सनीने एक परफ्यूम कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. 'लस्ट बाय सनी लिऑन' असं या परफ्यूमचं नाव असणार आहे. याबाबतचं ट्विटही सनी लिऑनने केलं आहे. 

सनी लिऑन लवकरच हा परफ्यूम लॉन्च करणार आहे. सनी सध्या बेईमान इश्क आणि वन नाईट स्टँड या सिनेमाच्या डंबिंगमध्ये व्यस्त आहे. टीना और लोलो हा सनीचा आगामी चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.