सुपरस्टार कमल हसनला केलं रुग्णालयात दाखल

सुपरस्टार कमल हसनची तब्येत बिघडल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. फूड पॉयजनिंग झाल्यानं चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात भर्ती करण्यात आलंय. त्याच्या मॅनेजरनं ही माहिती दिलीय. 

Updated: Sep 16, 2014, 07:01 PM IST
सुपरस्टार कमल हसनला केलं रुग्णालयात दाखल title=

चेन्नई: सुपरस्टार कमल हसनची तब्येत बिघडल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. फूड पॉयजनिंग झाल्यानं चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात भर्ती करण्यात आलंय. त्याच्या मॅनेजरनं ही माहिती दिलीय. 

मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळीच कमल हसनला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याची प्रकृती बरी असल्याचं सांगण्यात आलंय. कमल हसनला एक-दोन दिवसांत रुग्णालयातून सुट्टी मिळणार आहे.  

59 वर्षीय कमल हसन सध्या तमिळ चित्रपट ‘Papanasam’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. बुधवारपासून ते शूटिंग सुरू करण्रा असल्याची माहितीही कमल हसनच्या मॅनेजरनं दिलीय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.