'क्रिचर 3डी' मध्ये सुरवीनचा हॉट अँड बोल्ड सीन

Last Updated: Wednesday, September 3, 2014 - 21:32
'क्रिचर 3डी' मध्ये सुरवीनचा हॉट अँड बोल्ड सीन

मुंबई :  हेट स्टोरी-२ मध्ये हॉट अंदाजाने धमाक केल्यानंतर अभिनेत्री सुरवीन चावला पुन्हा एकदा बोल्ड अवतारात दिसणार आहे. नुकताच बिपाशा बसू स्टारर चित्रपट क्रिचर ३डीचा प्रमोशलन व्हिडिओचे शुटिंग झाले. त्यात सुरवीन एका हॉट आणि बोल्ड अंदाजात दिसून आली. 

या व्हिडिओ सुरूवीनचा अत्यंत बोल्ड अंदाज दिसून येत आहे. या व्हिडिओत सुरवीनसह रजनीश दुग्गल दिसत आहे. व्हिडिओतील गाणे मोहब्बत बरसा दे... हे अरिजीत सिंगने गायले आहे.

हे गाणे सध्या खूप हीट होत आहे. सुरवीन आणि रजनीश दुग्गल याच्यावर हा व्हिडिओ मुंबईतील स्टुडिओत शूट करण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन विक्रम भट्ट यांनी केले आहे. रजनीशने यापूर्वी विक्रम भट्ट यांच्यासोबत १९२०मध्ये काम केले होते. क्रिचर हा चित्रपट येत्या १२ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

First Published: Wednesday, September 3, 2014 - 21:32
comments powered by Disqus