सुष्मिता सेन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

By Intern | Last Updated: Thursday, April 20, 2017 - 10:42
सुष्मिता सेन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतू या वेळी ती तुम्हाला एका जाहिरातीतून छोट्या पडद्यावर दिसणार आहे.

'नो प्रॉब्लम' या चित्रपटानंतर तीची ही पहिली जाहिरात असणार आहे. आपल्या मुलींसोबत वेळ घालवता यावा म्हणून तीने चित्रपट सृष्टीतून काढता पाय घेतला होता. त्यानंतर ती पुन्हा एकदा जाहिरातीतून पडद्यावर झळकणार आहे. ही एक मिनरल वॉटरची जाहिरात आहे. त्याचा व्हिडिओ तिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

मिस युनिव्हर्स अॅवार्ड जिंकलेली सुष्मिता सेन पहिली भारतीय महिला आहे. २१ मे १९९४ मध्ये तिने हा अॅवार्ड जिंकला होता. सुष्मिता २५ वर्षाची असताना तिने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तीने दोन मुलींना दत्तक घेतले आहे.

पाहा व्हिडिओ

First Published: Thursday, April 20, 2017 - 10:42
comments powered by Disqus