बॉलिवूडच्या या सेलिब्रिटींनी नाही केलं मतदान

मुंबई महापालिकेचं मतदान पार पडतंय. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला एक विशेष महत्त्व आहे. अनेक मोठी मंडळी हे मुंबईमध्ये राहतात. त्यामुळे अनेक सेलिब्रिटींनी देखील मतदानाचा हक्क आज बजावला. अनुष्का शर्मा, रेखा, श्रद्धा कपूर, प्रेम चोपडा यांनी आज मतदान केलं. पण असे अनेक सेलिब्रिटी आहे ज्यांनी मतदान नाही केलं.

Updated: Feb 21, 2017, 05:39 PM IST
बॉलिवूडच्या या सेलिब्रिटींनी नाही केलं मतदान title=

मुंबई : मुंबई महापालिकेचं मतदान पार पडतंय. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला एक विशेष महत्त्व आहे. अनेक मोठी मंडळी हे मुंबईमध्ये राहतात. त्यामुळे अनेक सेलिब्रिटींनी देखील मतदानाचा हक्क आज बजावला. अनुष्का शर्मा, रेखा, श्रद्धा कपूर, प्रेम चोपडा यांनी आज मतदान केलं. पण असे अनेक सेलिब्रिटी आहे ज्यांनी मतदान नाही केलं.

१. प्रियंका चोपडा : प्रियंका चोपडा 'क्वॉन्टिको'च्या सेकंड सीजनच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे तिला मतदानासाठी नाही येता आलं.

२. आमिर खान : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने सुद्धा मतदान नाही केलं. आमिर खान सध्या 'ठग्स ऑफ हिन्दोस्तान'च्या शूटिंगसाठी परदेशात आहे.

३. ऋषी कपूर : ऋषी कपूर आणि त्यांची पत्नी नीतू कपूर सध्या हाँगकाँगमध्ये आहे. ते २२ फेब्रुवारीला मुंबईला परतणार आहेत त्यामुळे त्यांनी देखील मतदानाची संधी गमावली.

४. संजय दत्त : संजय दत्त 'भूमी'च्या शूटिंगसाठी सध्या आग्रामध्ये आहे त्यामुळे त्यानेही मतदानाचा हक्क गमावला.

५. शाहिद कपूर, सैफ अली खान आणि कंगना रानौत : 'रंगून' सिनेमा या आठवड्यात रिलीज होणार आहे. त्यामुळे ते तिघेही सिनेमाच्या प्रमोशनसाठी व्यस्त आहेत.

६. हृतिक रोशन : हेल्थ स्पासाठी हृतिक सध्या परदेशात आहे त्यामुळे त्यानेही मतदान नाही केलं.

६. जावेद अख्तर : जावेद अख्तर बंगळुरुमध्ये त्यांच्या पत्नी शबाना आजमी यांच्यासोबत आहेत. त्यामुळे त्यांनी ही यंदा मतदान नाही केलं.

७. कपिल शर्मा : कॉमेडी किंग कपिल शर्मा देखील मतदान नाही करु शकला कारण त्याचं यादीमध्ये नावच नसल्याचं बोललं जातंय.