हे आहे कॉमेडी नाईट बंद होण्याचे कारण, सीईओने केला खुलासा

कॉमेडी नाईट्स विथ कपिल या शोच्या जागी नवा शो आला आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का कॉमेडी नाईट्स विथ कपिल हा शो बंद होण्याचे खरं कारण काय आहे ते. 

Updated: Feb 2, 2016, 12:29 PM IST
हे आहे कॉमेडी नाईट बंद होण्याचे कारण, सीईओने केला खुलासा title=

मुंबई : कॉमेडी नाईट्स विथ कपिल या शोच्या जागी नवा शो आला आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का कॉमेडी नाईट्स विथ कपिल हा शो बंद होण्याचे खरं कारण काय आहे ते. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत चॅनेलचे सीईओ यांनी शो बंद कऱण्यामागचे खेर कारण सांगितलेय. 

चॅनेलच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार कपिलने कराराचे उल्लंघन केलेय. तसेच विशिष्ट करारानंतरही कपिलने दुसऱ्या चॅनेलसाठी प्रोग्राम करणे सुरु केले होते. मात्र त्यानंतरही कॉमेडी नाईट्सचा शो सुरु रहावा असे त्याला वाटत होते. 

कपिल यांनी स्वत:च या शोचे साप्ताहिक प्रसारण करावे असे म्हटले होते असा आरोप सीईओनी यावेळी केला. सुरुवातीला हा शो शनिवार आणि रविवार या दोन दिवशी दाखवण्यात येत असे. मात्र चित्रपट आणि इतर कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांना या शोचे साप्ताहिक प्रसारण करावे असे म्हटले होते. कपिल यांच्याशी खटके उडाले असले तरी व्यक्ती आणि कलाकार म्हणून कपिल शर्माच्या प्रती चॅनेलला आदर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.