'शारिरिक संबंधांचं स्वातंत्र्य म्हणजे सशक्तीकरण नाही'

दीपिका पदुकोणचा व्हिडीओ माय चॉईसला लोकांकडून विरोध होत असल्याचंही दिसून येत आहे, या व्हिडीओ खाली आलेल्या प्रतिक्रिया जास्तच जास्त नापसंती व्यक्त करणाऱ्या आहेत.

Updated: Apr 2, 2015, 10:19 AM IST
'शारिरिक संबंधांचं स्वातंत्र्य म्हणजे सशक्तीकरण नाही' title=

मुंबई : दीपिका पदुकोणचा व्हिडीओ माय चॉईसला लोकांकडून विरोध होत असल्याचंही दिसून येत आहे, या व्हिडीओ खाली आलेल्या प्रतिक्रिया जास्तच जास्त नापसंती व्यक्त करणाऱ्या आहेत.

महिला सशक्तीकरणाची नवी सुरूवात दाखवण्यासाठी हा व्हिडीओ बनवण्यात आला आहे, मात्र यातील काही गोष्टींवर लोकांनी आक्षेप नोंदवण्यास सुरूवात केली आहे, आक्षेप नोंदवणाऱ्यांची यादी वाढत चालली आहे, यात सोनाक्षी सिन्हाचा देखिल समावेश आहे.

दीपिका पादुकोणच्या या व्हिडीओत महिला अभिव्यक्तीवर दीपिकाने आपले विचार मांडले आहेत, यावर सोनाक्षी म्हणते मी अजूनही दीपिकाचा हा व्हिडीओ पाहिलेला नाही, पण मला हे माहित आहे हा व्हिडीओ महिला सशक्तीकरणाची विचारधारा मजबूत करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

यावर पुढे बोलतांना सोनाक्षी म्हणते, "पण मला म्हणायचं आहे, सशक्तीकरण त्या महिलांचं झालं पाहिजे ज्यांना याची गरज आहे, अशा लोकांच्या सशक्तीकरणाची गरज नाही ज्यांचं पालन पोषण हे सुखी आणि समृद्ध कुटूंबात झालं असेल".

सोनाक्षी म्हणते, "महिला सशक्तीकरणाची ही सुरूवात असेल तर हे खूप चांगलं आहे, मात्र महिला सशक्तीकरणाचा हा अर्थ नाही की, आपण कशा प्रकारचे कपडे घालावेत आणि कुणाबरोबर शारिरिक संबंध ठेवावेत, महिला सशक्तीकरण म्हणजे महिलांना रोजगार आणि शक्ती देणे".

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.