'टाइमपास २' ला मिळेना मल्टीप्लेक्स, मराठी सिनेमांकडे पाठ

एस्सेल व्हिजन निर्मित आणि रवी जाधव दिग्दर्शित 'टाइमपास २' हा सिनेमा उद्या प्रदर्शित होत आहे. सिनेमाची जोरदार चर्चा असली किंवा सिनेमाचं कितीही प्रमोशन केलं तरी, मराठी सिनेमा आणि मल्टीप्लेक्सवाल्यांचं तेच रडगाणं चालू आहे. राज्यात मराठीला दुय्यम स्थान देण्यात येत असल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे.

Updated: Apr 30, 2015, 03:02 PM IST
 'टाइमपास २' ला मिळेना मल्टीप्लेक्स, मराठी सिनेमांकडे पाठ  title=

मुंबई : एस्सेल व्हिजन निर्मित आणि रवी जाधव दिग्दर्शित 'टाइमपास २' हा सिनेमा उद्या प्रदर्शित होत आहे. सिनेमाची जोरदार चर्चा असली किंवा सिनेमाचं कितीही प्रमोशन केलं तरी, मराठी सिनेमा आणि मल्टीप्लेक्सवाल्यांचं तेच रडगाणं चालू आहे. राज्यात मराठीला दुय्यम स्थान देण्यात येत असल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे.

एकिकडे टीपी २ हा सिनेमा सिंगल स्क्रिनवर रविवारपर्यंत हाऊसफुल झाल्याचं चित्र दिसतंय तर दुसरीकडे मल्टीप्लेक्स मालकांनी पुन्हा एकदा मराठी सिनेमांकडे पाठ फिरवलीये हे देखील स्पष्ट होताना दिसत आहे.

टीपी २ या सिनेमाला प्रेक्षकांकडुन मागणी असलीतरी, या सिनेमाला योग्य स्क्रिन देण्यात मल्टिप्लेक्सवाले अडवणूक करतायेत.  १ मे या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सिनेमा उद्या रिलीज केला जात आहे. मात्र महाराष्ट्र दिनीच, महाराष्ट्रातल्या मराठी सिनेमांच्या भवितव्यावर आता प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.