व्हिडिओ : ओमपुरी यांचा आत्मा भटकतोय?

बॉलिवूडचे दिवंगत ज्येष्ठ अभिनेते ओमपुरी यांच्याबद्दल अनेक चर्चांणा उधाण आलंय. केवळ भारतातच नाही तर पाकिस्तानातही ओमपुरी यांच्याबद्दल चर्चा सुरू आहे. ओमपुरी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं झाला परंतु मृत्यूनंतरही त्यांचं 'बहुचर्चित भूत' सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतंय. 

Updated: Apr 19, 2017, 04:52 PM IST
व्हिडिओ : ओमपुरी यांचा आत्मा भटकतोय? title=

मुंबई : बॉलिवूडचे दिवंगत ज्येष्ठ अभिनेते ओमपुरी यांच्याबद्दल अनेक चर्चांणा उधाण आलंय. केवळ भारतातच नाही तर पाकिस्तानातही ओमपुरी यांच्याबद्दल चर्चा सुरू आहे. ओमपुरी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं झाला परंतु मृत्यूनंतरही त्यांचं 'बहुचर्चित भूत' सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतंय. 

होय, सोशल मीडियावर ओमपुरी यांचं भूत सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. पांढऱ्या कपड्यात ओमपुरी यांचं भूत फिरताना दिसल्याचा दावा एका पाकिस्तानी चॅनलनं केलाय. कुणाचा तरी बदला घेण्यासाठी ओमपुरी यांचा 'आत्मा' अनेक दिवसांपासून मुंबईच्या रस्त्यांवर भटकतोय, असा दावाही या चॅनलनं केलाय.  

पाकिस्तानी न्यूज चॅनलचा अँकर आमिर लियाकत यांच्या म्हणण्यानुसार, ओमपुरी यांचा आत्मा गेल्या काही दिवसांपासून ओमपुरी राहत होते त्या सोसायटीमध्येही त्यांचं भूत दिसण्याच्या चर्चा सुरू आहेत. 

6 जानेवारी 2017 रोजी ओमपुरी यांचा मृतदेह त्यांच्या अंधेरीस्थित राहत्या घरात आढळला होता. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं झाल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यांच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्नचिन्हही उपस्थित करण्यात आले होते.