नसीरुद्दीन शाहंच्या 'त्या' वक्तव्यावर ट्विंकल खन्ना भडकली

अभिनेत्री ट्विंकल खन्ना अभिनेता नसीरुद्दीन शाह यांच्यावर नाराज आहे. ट्विटरच्या माध्यामातून तिने आपली नाराजी व्यक्त केली आहे. नसीरुद्दीन शाह यांनी राजेश खन्नाला एक कमजोर अभिनेता असल्याचं म्हटलं होतं आणि त्यांच्यामुळे हिंदी सिनेमांची स्तर हा खालावल्याचं देखील नसीरुद्दीन शाह यांनी म्हटलं होतं. यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते.

Updated: Jul 24, 2016, 05:19 PM IST
नसीरुद्दीन शाहंच्या 'त्या' वक्तव्यावर ट्विंकल खन्ना भडकली title=

मुंबई : अभिनेत्री ट्विंकल खन्ना अभिनेता नसीरुद्दीन शाह यांच्यावर नाराज आहे. ट्विटरच्या माध्यामातून तिने आपली नाराजी व्यक्त केली आहे. नसीरुद्दीन शाह यांनी राजेश खन्नाला एक कमजोर अभिनेता असल्याचं म्हटलं होतं आणि त्यांच्यामुळे हिंदी सिनेमांची स्तर हा खालावल्याचं देखील नसीरुद्दीन शाह यांनी म्हटलं होतं. यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते.

ट्विंकलची प्रतिक्रियाः

ट्विंकल ट्विट केलं आहे की, 'सर, जर तुम्ही जीवंत व्यक्तींना सन्मान नाही देऊ शकत तर कमीत कमी त्यांना त्या लोकांचा तरी सन्मान करा जे आता या जगात नाही आणि तुम्हाला उत्तर देण्याच्या स्थितीत नाही आहेत. 

करण जोहरने देखील ट्विंकल खन्नाच्या या ट्विटचं समर्थन करत म्हटलं आहे की 'मी तुझाशी सहमत आहे.'

करण जोहरने म्हटलं की, 'मी नसीरुद्दीन शाह यांचं वरिष्ठ म्हणून सन्मान करतो. पण एका इंडस्ट्रीतील सदस्य म्हणून त्याचं असं वक्तव्य योग्य नाही.'