आदित्य, कतरिना आणि रणबीर... दुखावलेली मनं, दुभागलेले रस्ते!

'दोस्त दोस्त ना रहा... प्यार प्यार ना रहा'... गाणं आठवत असेलच तुम्हाला... आदित्य, कतरिना आणि रणबीरकडे पाहून हे गाणं आठवणार ना...!

Updated: Jan 5, 2017, 09:59 AM IST
आदित्य, कतरिना आणि रणबीर... दुखावलेली मनं, दुभागलेले रस्ते! title=

मुंबई : 'दोस्त दोस्त ना रहा... प्यार प्यार ना रहा'... गाणं आठवत असेलच तुम्हाला... आदित्य, कतरिना आणि रणबीरकडे पाहून हे गाणं आठवणार ना...!

काही दिवस एकत्र राहिल्यानंतर आता कतरिना आणि रणबीर वेगळे झालेत... अनेकांना माहीत आहे की, आदित्य रॉय कपूर आणि रणबीर कपूर यांच्यात खूप चांगली मैत्री आहे... पण, याच मैत्रीमध्ये आता कॅट आलीय.

आदित्य सध्या कतरिनाबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवतो आहे. 'ये जवानी है दिवानी' या सिनेमात रणबीर आणि आदित्यनं एकत्र काम केलं होतं... दोघंही अनेकदा एकत्र पार्टीमध्ये जातात, फुटबॉलचे सामने खेळतात आणि एकत्र फिरताना त्यांना अनेकदा पाहिलं गेलंय. 

पण आता कतरिनामुळे आदित्य आणि रणबीरच्या मैत्रीत दुरावा आल्याची चर्चा बी-टाऊनमध्ये रंगतेय. 

रणबीरने काही दिवसांपूर्वी त्याच्या नवीन घराची एक पार्टी दिली होती. आदित्य मात्र या पार्टीत नव्हता. त्यामुळे आदित्य आणि रणबीरचे रस्ते कॅटमुळे दुभागले की काय? अशी चर्चा बीटाऊनमध्ये रंगताना दिसत आहे.