केआरके आणि अभिषेक बच्चनमध्ये ट्विटर वॉर

कमाल राशिद खान म्हणजेच केआरके आणि अभिषेक बच्चन यांच्यामध्ये ट्विटरवर जोरदार खडाजंगी झाली आहे.

Updated: May 23, 2016, 05:47 PM IST
केआरके आणि अभिषेक बच्चनमध्ये ट्विटर वॉर title=

मुंबई : कमाल राशिद खान म्हणजेच केआरके आणि अभिषेक बच्चन यांच्यामध्ये ट्विटरवर जोरदार खडाजंगी झाली आहे. केआरकेनं अभिषेक बच्चनच्या कारकिर्दीवर प्रश्न उपस्थित करणारं ट्विट केलं. या ट्विटला मग अभिषेक बच्चननंही प्रत्युत्तर दिलं. 

अभिषेक बच्चनचा स्वत:च्या अभिनयाच्या जोरावर चाललेला शेवटचा चित्रपट म्हणजे 2007मध्ये आलेला गुरु. माझं चुकत असेल तर दुरुस्त करा, असं ट्विट केआरकेनं केलं. 

केआरकेच्या या ट्विटवर मग अभिषेकनंही प्रतिक्रिया दिली. केआरके हे चुकीचं आहे. गुरुमध्ये मिथून, आर. माधवन, विद्या बालन आणि ऐश्वर्या यांच्यासारखे दिग्गज कलाकार होते, असं अभिषेक म्हणाला. 

मग केआरकेनंही पुन्हा अभिषेकला प्रत्युत्तर दिलं. अभिषेक तुझं बरोबर आहे, पण त्यावेळी तु आणि ऐश्वर्याच मोठे अभिनेते होतात असं केआरके म्हणाला.