सचिनचे हे रेकॉर्ड्स कधी तुटतील का ?

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज ४२ वर्षांचा झाला आहे. सचिनला आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन दोन वर्ष झाली आहेत. मात्र आजही त्याची 

Updated: Apr 24, 2015, 03:08 PM IST
सचिनचे हे रेकॉर्ड्स कधी तुटतील का ? title=

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज ४२ वर्षांचा झाला आहे. सचिनला आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन दोन वर्ष झाली आहेत. मात्र आजही त्याची 

लोकप्रियता कुठेही कमी झालेली नाही. सचिनने आपल्या कारकिर्दित क्रिकेटमधील अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले. त्यातील काही रेकॉर्ड कधी तुटले जातील की नाही 

अशी शंका आहे. 

सचिनचे असेच काही रेकॉर्ड्स

१) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनच्या नावे १०० शतकं आहेत. हा रेकॉर्ड तुटणं सध्या तरी अशक्यचं वाटत आहे. 
 
२) २०० कसोटी सामने खेळला आहे. २०० सामने खेळणारा सचिन एकमेव खेळाडू आहे.  सचिननंतर ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉंटिंगचा नंबर लागतो. पॉंटिंग १६८ कसोटी 

सामने खेळला आहे. 

३) कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्डही सचिनच्याच नावे आहे. सचिनने २०० सामन्यात १५,९२१ धावा केल्या आहेत. सचिनच्या या रेकॉर्डच्या 

जवळपासदेखील कोणीच नाही. 

४) कसोटी क्रिकेटमध्ये शतकाचं अर्धशतक करणारा सचिन एकमेव खेळाडू आहे. सचिनने ५१ शतकं ठोकली आहेत. त्याच्यानंतर जॅक कॅलिसच्या नावे ४५ शतकं 

आहेत.

५) एकदिवसीय सामन्यांमध्ये सचिनने ४९ शतकं ठोकली आहेत.

६) एकदिवसीय सामन्यांमध्ये सचिनच्या नावे ९६ अर्धशतकं आहेत. त्याच्या या रेकॉर्डच्या जवळपास पोहचलेले कुमार संगकारा, जॅक कॅलिस, राहुल द्रविड, 

इंजमाम-उल-हक यांनीही क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

७) एकदिवसीय सामन्यांत सचिनने २००० पेक्षा जास्त चौकार मारले आहेत. त्याच्या ह्या रेकॉर्डच्या जवळपास कोणीही नाही. 

८) सर्वात जास्त ४६३ एकदिवसीय सामने खेळण्याचा रेकॉर्डही सचिनच्या नावे आहे. सचिनच्या या रेकॉर्डच्या जवळ पोहचलेला कुमार संगकाराने ४४८ सामने खेळून 

क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 

९) दुसऱ्या विकेटसाठी सर्वाधिक ३३१ धावांची भागीदारीचा रेकॉर्ड सचिन आणि द्रविडच्या नावे आहे. न्यूझीलंडविरूद्ध हैदराबादमध्ये त्यांनी ही भागीदारी केली होती. 

१०) एकदिवसीय सामन्यात एका वर्षात सर्वाधिक १८९४ धावा सचिनने केल्या आहेत. हा रेकॉर्ड गेली १७ वर्षांपासून सचिनच्या नावे आहे. 

११) सचिनने एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक १८,४२६ धावा केल्या आहेत.

१२) एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक ६७३ धावांचा रेकॉर्ड आजपर्यंत तोडण्यात कोणाला यश मिळालेलं नाही. हा रेकॉर्ड सचिनने २००३च्या वर्ल्ड कपमध्ये केला होता. 

१३) १८ वेळा नाइन्टीज् बनवण्याचा रेकॉर्डही सचिनच्याच नावे आहे.

१४) कसोटी सामन्यांमध्ये सचिनने ११९ अर्धशतकं केली आहेत. सचिनच्या या रेकॉर्डटच्या जवळपासही कोणी नाही. 

१५) कसोटी सामन्यांमध्ये सचिनने २०५८ चौकार ठोकले आहेत, हाही एक रेकॉर्डच आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.