कुमारी आलियाला तिच्या 'नवऱ्याने' केलं बर्थ डे विश

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटने मंगळवारी आपला २३वा वाढदिवस साजरा केला. 

Updated: Mar 16, 2016, 08:53 PM IST
कुमारी आलियाला तिच्या 'नवऱ्याने' केलं बर्थ डे विश  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटने मंगळवारी आपला २३वा वाढदिवस साजरा केला. तिच्या या वाढदिवसाला तिला सर्वांनी शुभेच्छा दिल्या. त्यातील काही शुभेच्छा मात्र तिच्यासाठी जास्त खास होत्या. 

लग्न न झालेल्या आलियाला तिच्या नवऱ्यानेही शुभेच्छा दिल्या. आणि हो, हा नवरा तो नसून 'ती' आहे. चक्रावून गेलात ना? थांबा. हा नवरा म्हणजे म्हणजे आलियाची चड्डी बडी आकांक्षा रंजन. आकांक्षाने इंस्टाग्रामरवर आलियाचा आणि तिचा लहानपणीचा एक फोटो शेअर केलाय. त्यात लहानपणीच्या दोघी फ्रॉक घालून खेळताना दिसतायत. दोघींची मैत्री इतकी आहे की त्या एकमेकींना बेटर हाफ मानतात. 

आलिया मात्र सध्या तिच्या आगामी 'कपूर अॅण्ड सन्स' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आता तिच्या नवऱ्याकडून आलेल्या या शुभेच्छांमुळे तिचा वाढदिवस स्पेशल झाला असणार हे वेगळं सांगण्याची गरज नाही.