अभिनेता समलान खानला दिलासा, सुनावणी पुढे ढकलली

बहुचर्चीत काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर न्यायालयात आज अंतिम निकाल लागणार होता. मात्र, ३ मार्चपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आर्म्स एक्ट नूसार सलमान खानवर गुन्हा दाखल झाला होता.

Updated: Feb 25, 2015, 12:03 PM IST
अभिनेता समलान खानला दिलासा, सुनावणी पुढे ढकलली title=

जोधपूर : बहुचर्चीत काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर न्यायालयात आज अंतिम निकाल लागणार होता. मात्र, ३ मार्चपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आर्म्स एक्ट नूसार सलमान खानवर गुन्हा दाखल झाला होता.

बॉलीवूडचा दबंग स्टार सलमान खानच्या काळवीट शिकार प्रकरणी अडचणीत येण्याची शक्यता आहे. या बहुचर्चीत प्रकरणात आज जोधपूर न्यायालय अंतिम निकाल होता. यावेळी सलमानला कोर्टात हजर रहाण्याचे आदेश देण्यात आले होते.

1 आणि 2 ऑक्टोबर 1998 मध्ये हम साथ साथ है या चित्रपटाच्या शूटींग दरम्यान सलमाननं कनकनी गावात काळवीटांची शिकार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. ज्या बंदूकीनं सलमाननं शिकार केली होती त्या बंदूकीचा परवाना संपल्याचंही उघड झालंय. 

त्यामुळे सलमानवर जोधपूर वन विभागानं आर्म्स ऍक्टनुसार गुन्हा नोंदवलाय. या प्रकरणी सलमान दोषी आढळल्यास त्याला 3 ते 7 वर्षाची शिक्षा होऊ शकते. या प्रकरणात अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम हे देखील सहआरोपी आहेत. शिकार करण्यासाठी सलमानला मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.