VIDEO : रिमा लागू यांचे सिनेमातील गाजलेले काही सीन

अभिनयाच्या माध्यमातून हिंदी, मराठी सिनेसृष्टी तसेच रंगभूमीवर आपली वेगळी छाप सोडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे गुरुवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. त्यांच्या अचानक एक्झीटने चित्रपटसृष्टीत धक्का बसला आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 18, 2017, 10:42 AM IST
VIDEO : रिमा लागू यांचे सिनेमातील गाजलेले काही सीन
छाया सौजन्यू - यू-ट्यूब

मुंबई : अभिनयाच्या माध्यमातून हिंदी, मराठी सिनेसृष्टी तसेच रंगभूमीवर आपली वेगळी छाप सोडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे गुरुवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. त्यांच्या अचानक एक्झीटने चित्रपटसृष्टीत धक्का बसला आहे. 

रिमा लागू यांनी आपल्या कसदार अभिनयाच्या माध्यमातून अनेक व्यक्तिरेखा जिवंत साकारल्या होत्या. आईकडूनच त्यांना अभिनयाचे बाळकडू मिळाले होते. अनेक हिंदी सिनेमांमधून त्यांनी साकारलेली ‘आई’ आजही अनेकांच्या लक्षात आहे. 

विशेषतः सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटांमधून त्यांनी साकारलेली ‘आई’ विशेष गाजली होती. तर वास्तवरमधील भूमिकाही लक्षात राहते. त्यांनी ज्या सिनेमात काम केले त्या सिनेमातील गाजलेले काही सीन पाहा.