VIDEO : बीग बींच्या नातीचा 'प्रायव्हेट शो' सोशल मीडियावर व्हायरल

स्टारकिडस् म्हटलं की प्रसिद्धी आपसूकच येते... बॉलिवूड सेलिब्रिटी जितके चर्चेत असतात त्यांची मुलंही तितकाच भाव खाऊन जातात.  

Updated: May 10, 2017, 08:29 PM IST
VIDEO : बीग बींच्या नातीचा 'प्रायव्हेट शो' सोशल मीडियावर व्हायरल title=

मुंबई : स्टारकिडस् म्हटलं की प्रसिद्धी आपसूकच येते... बॉलिवूड सेलिब्रिटी जितके चर्चेत असतात त्यांची मुलंही तितकाच भाव खाऊन जातात.  

सध्या बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ही पुन्हा एकदा चर्चेत आलीय... ती तिच्या एका डान्स व्हिडिओमुळे... या व्हिडिओत रणबीर कपूरच्या 'दिल्ली वाली गर्लफ्रेंड' या गाण्यावर थिरकताना दिसतेय. 

व्हिडिओमध्ये पाठीमागून 'मसाज रुममधला नव्याचा प्रायव्हेट शो' असा आवाजही येतोय... या व्हिडिओनं सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर पहिल्याच दिवशी 34,800 व्ह्यूज मिळवलेत. 

#delhiwaligirlfriend . . . . #navyananda #navyanavelinanda

A post shared by Navya Naveli Nanda (@navya__nanda) on

ज्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय ते व्हिरिफाईड ट्विटर अकाऊंट नाही.

नव्याचे आई-वडील अॅक्टिंगच्या क्षेत्रापासून दूर असले तरी नव्या मात्र आजोबा अमिताभ, आजी, जया, मामा अभिषेक आणि मामी ऐश्वर्याप्रमाणेच अनेकदा चर्चेत असते. 

काही दिवसांपूर्वी, अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी हिचादेखील एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला होता. या व्हिडिओत एका पार्टीदरम्यान सफेद रंगाचा ऑफ शोल्डरच्या ड्रेसमध्ये जान्हवी आपल्या मित्रांसोबत थिरकताना दिसतेय. 

 

OMG my angel looks mind-blowing! Look at her moves she's so perfect @janhvikapoor6 this dress tho!

A post shared by Janhvi & Khushi Kapoor Updates (@janhviandkhushi) on