VIDEO : आरुषि हत्याकांडावर आधारित 'तलवार'चा ट्रेलर

देशातील बहुचर्चित अशा आरुषि हत्याकांड प्रकरणावर आधारित असलेल्या 'तलवार' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. या सिनेमात इरफान खान आणि कोंकणा सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 

Updated: Aug 22, 2015, 07:35 PM IST
VIDEO : आरुषि हत्याकांडावर आधारित 'तलवार'चा ट्रेलर title=

मुंबई : देशातील बहुचर्चित अशा आरुषि हत्याकांड प्रकरणावर आधारित असलेल्या 'तलवार' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. या सिनेमात इरफान खान आणि कोंकणा सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 

'तलवार' हा सिनेमा २ ऑकोटबर रोजी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. मेद्या गुलजार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या सिनेमात अभिनेत्री तब्बू हिचीदेखील महत्त्वाची भूमिका आहे. सिनेमाचे निर्माता आणि लेखक संगीतकार आहे विशाल भारदवाज.

१४ वर्षांची आरुषी तलवार आणि तलवार कुटुंबाच्या घरात नोकर असणारा ४५ वर्षीय हेमराज यांच्या हत्याकांडावर या सिनेमाचं कथानक बेतलेलं आहे. २००८ साली दिल्लीनजिक उत्तरप्रदेशातील नोएडामध्ये हे हत्याकांड घडलं होतं. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.