इंग्लंडविरुद्धच्या सीरिजआधी विराटने घेतली अनुष्काची भेट

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या सीरिजसोबत गर्लफ्रेंड अनुष्का शर्मासोबतच्या लव्ह अफेयर्सबाबत चर्चेत आहेत. नुकताच पुणे येथील वनडे सामन्याआधी वरळीमध्ये हे लव्ह बर्डस एकत्र दिसले होते. 

Updated: Jan 13, 2017, 12:46 PM IST
इंग्लंडविरुद्धच्या सीरिजआधी विराटने घेतली अनुष्काची भेट title=

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या सीरिजसोबत गर्लफ्रेंड अनुष्का शर्मासोबतच्या लव्ह अफेयर्सबाबत चर्चेत आहेत. नुकताच पुणे येथील वनडे सामन्याआधी वरळीमध्ये हे लव्ह बर्डस एकत्र दिसले होते. 

मीडिया रिपोर्टनुसार, हे दोघेही वरळीमध्ये आपले नवे घर पाहण्यासाठी आले होते. एक वर्षापूर्वी त्यांनी ओमकार वर्ली १९७३ मध्ये हे घर बुक केले होते. याआधी न्यू ईयर सेलिब्रेट करण्यासाठी दोघंही उत्तराखंडला गेले होते. ते दोघंही उत्तराखंडला गेल्यानंतर त्यांच्या साखरपुड्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. 

२०१५मध्ये वरळीमध्ये ८००० स्के. फुटांचे घर विराट ने बुक केले होते. हे घर ३५व्या मजल्यावर आहे. क्रिकेटर रोहित शर्मानेही गेल्या वर्षी येथेच चार बेडरुम फ्लॅट घेतला होता.