Trailer: 'सिंघम रिटर्न्स' पुन्हा एकदा जबरदस्त अॅक्शनसह अजय देवगण

 बॉलिवुड अभिनेता अजय देवगण आणि करीना कपूरचा चित्रपट ‘सिंघम रिटर्न्सचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. हा चित्रपट ‘सिंघम’ चा सिक्वल आहे, ‘सिंघम रिटर्न्स’मध्ये पुन्हा एकदा अजय जबरदस्त अॅक्शनसह दिसणार आहे. 

Updated: Jul 11, 2014, 04:07 PM IST
Trailer: 'सिंघम रिटर्न्स' पुन्हा एकदा जबरदस्त अॅक्शनसह अजय देवगण title=

मुंबई :  बॉलिवुड अभिनेता अजय देवगण आणि करीना कपूरचा चित्रपट ‘सिंघम रिटर्न्सचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. हा चित्रपट ‘सिंघम’ चा सिक्वल आहे, ‘सिंघम रिटर्न्स’मध्ये पुन्हा एकदा अजय जबरदस्त अॅक्शनसह दिसणार आहे. 

लोकसभा निवडणुकीत मोदींनी ज्या विषयावर विजय मिळविला तोच काळापैशावर हा चित्रपट बेतला आहे. या चित्रपटात बाजीराव सिंघम ब्लॅकमनी विरोधात लढताना दिसणार आहे. 

‘सिंघम’मध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या प्रकाश राजच्या जागी ‘सिंघम रिटर्न्स’मध्ये अमोल गुप्ते व्हिलनच्या रोलमध्ये दिसणार आहे. ट्रेलरवरून असे दिसते की प्रकाश राज यांची कमतरता अमोल गुप्ते भासू देणार नाही.

'मैं यहां इन्वेस्टिगेशन करने आया हूं जो कौड़ी का प्रवचन सुनने नहीं..' ' तो फिर किस काम की है ये वर्दी जो एक पुलिस वाले को मजबूत नहीं मजबूर बना देती है..' अशा प्रकारचे डायलॉग तुम्हांला टाळ्या वाजवायला भाग पाडतील. 

या चित्रपटात अनुपम खेर, दया शेट्टी, समीर धर्माधिकारी आणि विनीत शर्मा अभिनय करताना दिसणार आहे. येत्या १५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.  

 

पाहा सिंघम रिटर्न्सचा ट्रेलर

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.