दीपिकाने हॉलिवूड अभिनेता विन डीजलला शिकवली हिंदी

बॉलिवूडची सुप्रसिध्द अभिनेत्री दीपिका पदुकोणने xxx the return of xander cage या चित्रपटातून हॉलीवूडमध्ये पाऊल ठेवतेय. तिचा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. 

Updated: Sep 9, 2016, 02:41 PM IST
दीपिकाने हॉलिवूड अभिनेता विन डीजलला शिकवली हिंदी title=

मुंबई: बॉलिवूडची सुप्रसिध्द अभिनेत्री दीपिका पदुकोणने xxx the return of xander cage या चित्रपटातून हॉलीवूडमध्ये पाऊल ठेवतेय. तिचा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. 

यात दीपिका पदुकोण आणि हॉलिवूड अभिनेता विन डीजल यांनी भूमिका केली आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दीपिकाला बरेच काही शिकता आले त्याचबरोबर तिचा सहकारी अभिनेता वि डीजल यालाही तिने चक्क हिंदी बोलायला शिकवले. 

फेसबुक लाईव्हद्वारे दीपिका आणि विन यांनी चाहत्यांशी संवाद साधला. यात विन आपल्या मित्रांना त्यांच्या येणाऱ्या चित्रपटानंतर दीपिकाला सगळं जग ओळखेल असं सांगत आहे. तसेच यावेळी दीपिकाने त्याला हिंदीत लव्ह हा शब्द उच्चारण्यास सांगितले.