धोबीघाटावर दिसली अभिनेत्री दीपिका पदुकोण

दीपिका पदुकोण सध्या ट्रिपल एक्स यासिनेमाच्या प्रचारात व्यस्त आहे. या दरम्यान ती लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती या सिनेमाचे शूटिंग सुरु कऱणार असल्याची बातमी आली होती. 

Updated: Nov 12, 2016, 09:15 AM IST
धोबीघाटावर दिसली अभिनेत्री दीपिका पदुकोण title=

मुंबई : दीपिका पदुकोण सध्या ट्रिपल एक्स यासिनेमाच्या प्रचारात व्यस्त आहे. या दरम्यान ती लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती या सिनेमाचे शूटिंग सुरु कऱणार असल्याची बातमी आली होती. 

मात्र दीपिकाचे काही असे फोटो समोर आलेत जे पद्मावती या भूमिकेपेक्षा पूर्ण वेगळे आहेत. फोटोत दीपिका जुन्या आणि साध्या कपड्यांमध्ये दिसते. तसेच तिचे केसही विस्कटलेले आहेत. 

इराणचे प्रसिद्ध फिल्ममेकर माजिद मजिदी यांच्या एका प्रोजेक्टवर काम करतेय. यासंदर्भातच धोबीघाटावर स्क्रीन टेस्ट होती.