आलियाला मिळालं स्पेशल बर्थडे गिफ्ट!

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट सध्या बी-टाऊनच्या हॉट कपल्सपैंकी एक म्हणून ओळखलं जातंय. बऱ्याचदा या दोघांना एकमेकांसोबत क्वालिटी टाईम व्यतीत करताना पाहिलं गेलंय. 

Updated: Mar 18, 2015, 01:07 PM IST
आलियाला मिळालं स्पेशल बर्थडे गिफ्ट! title=

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट सध्या बी-टाऊनच्या हॉट कपल्सपैंकी एक म्हणून ओळखलं जातंय. बऱ्याचदा या दोघांना एकमेकांसोबत क्वालिटी टाईम व्यतीत करताना पाहिलं गेलंय. 

15 मार्च हा आलियाचा वाढदिवस असतो... या निमित्तानं आलियाला एक स्पेशल गिफ्ट मिळालंय... आणि ते म्हणजे कॅमेरा... हा कॅमेरा स्पेशल ठरलाय कारण तो आलियाला गिफ्ट केलाय सिद्धार्थनं... या स्पेशल गिफ्टमुळे आलिया भलतीच खुश झालीय. 

या कॅमेऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे, हा कॅमेरा स्पेशली अमेरिकेहून मागविला गेलाय. या हायटेक कॅमेऱ्यात अनेक लेटेस्ट फिचर्स आहेत. आलियाची सोशल वेबसाईटवर आपले फोटो टाकण्याची आवड पाहता आलियाला फोटोग्राफीची केवढी हौस आहे, हे तिच्या चाहत्यांच्या लगेचच लक्षात येईल.

गिफ्ट मिळाल्यानंतर या कॅमेऱ्यानं आलियानं अनेक फोटो क्लिक केलेत... यात तिच्या कॅमेऱ्यात सर्वात अगोदर कैद झाली ती खुद्द सिद्धार्थचीच छबी... आलियाच्या वाढदिवसानिमित्तानं सिद्धार्थ तिला भेटण्यासाठी गेला होता. दोघांनीही बराच वेळ एकमेकांसोबत घालवला. आत्ताआत्तापर्यंत आलिया-सिद्धार्थ यांच्या अफेअरची चर्चा होती... पण, पहिल्यांदाच ते उघडपणे होळीच्या निमित्तानं एकमेकांसोबत एन्जॉय करताना दिसले होते. 

सिद्धार्थ सध्या 'ब्रदर्स'च्या शूटींगमध्ये तर आलिया 'उडता पंजाब'च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.