...आणि अमिताभसाठी लतादीदींचे डोळे भरून आले!

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांचा खूप सन्मान करतात, ही गोष्ट तर एव्हाना सर्वांनाच माहीत आहे. पण, याच बीग बीमुळे लतादीदी अत्यंत भावूनकही झाल्यात.

Updated: Nov 18, 2014, 08:34 AM IST
...आणि अमिताभसाठी लतादीदींचे डोळे भरून आले! title=

मुंबई : स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांचा खूप सन्मान करतात, ही गोष्ट तर एव्हाना सर्वांनाच माहीत आहे. पण, याच बीग बीमुळे लतादीदी अत्यंत भावूनकही झाल्यात.

नुकतंच, ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात बीग बी अमिताभ बच्चन यांनी काही ओळी गायल्या होत्या. याच ओळी कानावर पडल्यानंतर लतादीदी खूपच भावूक झाल्यात. केबीसीच्या या शेवटच्या भागात गोविंदा, परिणीती चोपडा, रनवीर सिंह और अली जफर हेदेखील उपस्थित होते. 

‘मोहब्बत करनेवाले कम न होंगे, तेरी महफिल में लेकिन हम न होंगे’ या अमतजींनी गायलेल्या त्या दोन ओळी होत्या... अमितजींच्या या ओळी ऐकून माझे डोळे भरून आलेत, असं ट्विट गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी केलंय. 

अमिताभ बच्चन यांच्या प्रती असलेलं प्रेम आणि आदरही यावेळी व्यक्त केलाय. अमित जी तुमच्यासाठी माझ्या मनात एक खास जागा आहे... मी तुमचा खूप आदर करते. इश्वर तुम्हाल नेहमी आनंदी, दीर्घायुशी आणि उत्तम आरोग्य देवो, अशीच माझी मंगलकामना आहे, असं लतादीदी म्हणतायत. 

या ट्विटनंतर अमिताभ बच्चन यांनीही लता दीदींचे आभार मानलेत. लताजी माझ्याकडे तुमचे आभार मानण्यासाठी शब्दच नाहीत, असं अमिताभ बच्चन यांनी म्हटलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.