विद्या बालन होणार कोणाची `पडोसन`?

Last Updated: Wednesday, April 9, 2014 - 17:13

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
किस्मत कनेक्शन चित्रपटात लोकांमध्ये प्रचलित झालेली शाहीद कपूर आणि विद्या बालन ही जोडी येत्या काही दिवसात शेजारी-शेजारी येणार असल्याचे कळतंय. विशेष म्हणजे एके काळी विद्या बालन आणि शाहीद कपूर यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा कानावर ऐकू येत होत्या.
काही दिवसांपूर्वीच शाहीद कपूरने विद्या बालनच्याच हाउसिंग सोसायटीमध्ये घर घेतल आहे. या घराची किंमत 32 कोटी रुपये असल्याचे सांगितलं जातंय.
विद्या बालनने २०१२ मध्ये सिद्धार्थ रॉय कपूर सोबत लग्न केल्यापासून विद्या आणि शाहीद यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा बंद झाल्या होत्या. पण अचानक शाहीदने विद्याच्या सोसायटीमध्ये राहण्याचा निर्णय घेतल्याने, पून्हा शाहीद कपूर आणि विद्या बालन यांच्या बाबतीत बॉलिवूडमध्ये चर्चा सूरू होण्याची शक्यता आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो

First Published: Wednesday, April 9, 2014 - 17:13
comments powered by Disqus