घराबाहेर पडलेल्यांच्या मते कोण जिंकेल बिग बॉस?

मुंबई : बिग बॉसच्या ९ फिनालेमध्ये रोशेल राव, मंदना करिमी, रिशभ सिन्हा आणि प्रिन्स नरूला हे चार तगडे वीर पोहोचले आहेत. 

Updated: Jan 23, 2016, 11:29 AM IST
घराबाहेर पडलेल्यांच्या मते कोण जिंकेल बिग बॉस? title=

मुंबई : बिग बॉसच्या ९ फिनालेमध्ये रोशेल राव, मंदना करिमी, रिशभ सिन्हा आणि प्रिन्स नरूला हे चार तगडे वीर पोहोचले आहेत. आता यांच्यापैकी कोण जिंकणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. पण, बिग बॉसच्या याच सिझनमधून बाहेर पडलेल्या स्पर्धकांना कोण जिंकेल असं वाटतं ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे. 

सुयश राय - प्रिन्स. कारण कीश्वर बाहेर गेल्यापासून तो खूपच बदललायय कठोर झालाय. इमाम सिद्दीकी आला असताना तो ज्या पद्धतीने वागला, ते फारच छान होतं. प्रिन्स आणि मंदना मध्ये मला लढत वाटते. प्रिन्स ५१% आणि मंदना ४९%

कीश्वर मर्चंट - प्रिन्स हा एकटा मला चांगला वाटतो. मंदना त्याला टफ फाईट देईल; पण तरी त्याचं वागणं चांगलं आहे. त्याने काही चुका केल्या हे मान्य केलं तरी त्याने मला बहीण मानलंय. बाहेर आल्यावर तो ते नातं नक्की निभावेल. 

गिझेल ठकराल - मंदनाचा खेळ पाहता ती जिंकेल असं मला वाटतं. ती कोणालाही सोबत न घेता एकटी खेळत होती. कायम आपण बळी ठरलो हे तिने चांगलं मांडलं. पण, मला ऋषभ जिंकला तर आवडेल. कारण, वाईल्ड कार्ड एंट्रीने घरात आलेला कोणीतरी जिंकला तर इतिहास घडेल.

विकास भल्ला - मंदना. सुरुवातीपासून ती इथे मित्र बनवायला आली नाही. खेळ जसा खेळावा तसा ती खेळते आहे. तिला स्वतःचं असं एक व्यक्तिमत्व आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे ती माझी मैत्रीण आहे. 

अंकित गेरा - मंदना. कारण, पहिल्या दिवसापासून ती जाम कठोर राहिलीये. बोलण्यासाठी तिने योग्य वेळ पाहिली नाही. ती तिच्या हक्कांसाठी भांडली. ती सुंदरही आहे. सुंदर मुलगी जिंकली तर कोणाला आवडणार नाही?

अमन वर्मा - मला नेहमीच वाटलं होतं की रोशेल, कीश्वर किंवा मंदना जिंकेल. पण, आता कीश्वर बाहेर आहे तर मला रोशेल जिंकेल असं वाटतंय. घरात तिचं व्यक्तिमत्व सर्वात वेगळं आहे. 

रिमी सेन - मंदना. कारण अगदी पहिल्या दिवसापासून आजतागायत ती आहे तशी आहे. 

दिगांगना सूर्यवंशी - मंदना. कारण, आजवर तिने जे काही केलंय त्याविषयी ती ठाम राहिली आहे. 

युविकी चौधरी - प्रिन्स. कारण त्याचे अनेक चाहते आहेत जे त्याच्यावर जिवापाड प्रेम करतात. 

नोरा फतेही - प्रिन्स. कारण, तो खूप कठीण स्पर्धक राहिलाय. त्याने सर्व टास्कही छान केलेत. प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजनही केलंय.