ए दिल है मुश्किलला संपूर्ण सहकार्याचं राजनाथ सिंग यांचं आश्वासन

ए दिल है मुश्कील चित्रपटाच्या प्रदर्शनाला संपूर्ण सहकार्य करू. सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून चित्रपट कोणत्याही गोंधळाशिवाय प्रदर्शित होईल

Updated: Oct 20, 2016, 07:50 PM IST
ए दिल है मुश्किलला संपूर्ण सहकार्याचं राजनाथ सिंग यांचं आश्वासन title=

नवी दिल्ली : ए दिल है मुश्कील चित्रपटाच्या प्रदर्शनाला संपूर्ण सहकार्य करू. सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून चित्रपट कोणत्याही गोंधळाशिवाय प्रदर्शित होईल, असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी निर्माते-दिग्दर्शकांच्या शिष्टमंडळाला दिलं आहे.

ए दिल है मुश्कील चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा मनसेनं दिल्यानंतर निर्माते-दिग्दर्शकांच्या शिष्टमंडळानं राजनाथ सिंग यांची भेट घेतली. याभेटीवेळी राजनाथ सिंग यांनी हे आश्वासन दिल्याची प्रतिक्रिया मुकेश भट यांनी दिली आहे.

ए दिल है मुश्कीलमध्ये पाकिस्तानी कलाकार फवाद खान असल्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाला मनसेनं विरोध केला आहे. मल्टीप्लेक्सच्या काचा महाग असतात असं म्हणत मनसेनं पुन्हा एकदा खळ कटॅकची भाषा वापरली आहे. त्यामुळे धास्तावलेल्या निर्माते-दिग्दर्शकांनी दिल्लीत जाऊन गृहमंत्र्यांची भेट घेतली आहे.