विद्या बालनचा आगामी चित्रपट ‘बेगम जान’

अभिनेत्री विद्या बालन आता ‘बेगम जान’ या नव्या सिनेमात दिसणार आहे. 1947 च्या भारत-पाक फाळणीवर आधारित या सिनेमाचे दिग्दर्शन श्रीजीत मुखर्जी यांनी केले आहे. 2015 मध्ये आलेल्या ‘राजकाहिनी’ या बंगाली चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीजीत यांनी केले होते. ‘बेगम जान’ हा याच ‘राजकाहिनी’ चित्रपटाचा रिमेक आहे. यात विद्या बालन मुख्य भूमिकेत दिसेल.

Updated: Aug 1, 2016, 01:06 PM IST
विद्या बालनचा आगामी चित्रपट ‘बेगम जान’ title=

मुंबई : अभिनेत्री विद्या बालन आता ‘बेगम जान’ या नव्या सिनेमात दिसणार आहे. 1947 च्या भारत-पाक फाळणीवर आधारित या सिनेमाचे दिग्दर्शन श्रीजीत मुखर्जी यांनी केले आहे. 2015 मध्ये आलेल्या ‘राजकाहिनी’ या बंगाली चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीजीत यांनी केले होते. ‘बेगम जान’ हा याच ‘राजकाहिनी’ चित्रपटाचा रिमेक आहे. यात विद्या बालन मुख्य भूमिकेत दिसेल.

तसेच नागेश कुकुनूरच्या ‘धनक’ सिनेमात चमकलेली अभिनेत्री फ्लोरा सैनीने सहकलाकार म्हणून काम केले आहे. ‘‘सुरूवातीला विद्या बालन यांच्यासोबत काम करताना खूप दडपण वाटायचं. पण नंतर त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं’’ अशी प्रतिक्रिया फ्लोराने दिली.